अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज शिंदखेडा यांच्यावतीने दोंडाईचा येथील तहसील कार्यालयात निवेदन सादर
सोमवार, सप्टेंबर १५, २०२५
0
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज शिंदखेडा यांच्यावतीने दोंडाईचा येथील तहसील कार्यालयात येथे विविध ओबीसी आरक्षण बचाव मागणीचे निवेदन देण्यात आले शहर व तालुक्यातील समस्त ओबीसी समाज तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दोंडाईचा तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून नुकताच आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटीयर बाबत काढलेला शासन निर्णय (GR )हा पूर्णपणे असविधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग या परवागरातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे तरीदेखील शासनाच्या दबावाखाली न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून 53 लाखाहून अधिक बोगस कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रकार सुरू आहे तरी हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात असून न्यायमूर्ती शिंदे समिती ही पक्षपाती पद्धतीने काम करीत आहे ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे त्यामुळे 1)हैदराबाद गॅझेटीयर वरील शासन निर्णय जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा 2)ओबीसी मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 53 लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करण्यात याव्यात 3) न्यायमूर्ती शिंदे समिती चे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्याने ती समिती तात्काळ बरखास्त करावी 4)आमच्या ओबीसी प्रवर्गातून समाजाची होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावे तसेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून घटनाबाह्य आंदोलन उभारून शासनावर एक प्रकारे दबाव तंत्र वापरण्याच्या कार्यक्रम महाराष्ट्रात राबविला जात आहे सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेला मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे हे मूळ ओबीसी घटकांच्या सहार करण्याच्या डाव असून याला शासनाने मदत देणे किंवा साथ देणे हे गंभीर अपराधामान व असविधानिक आहे गतकाळात महाराष्ट्र अनेकदा बेकायदेशीर आंदोलनाने होरपला आहे परंतु शासनाने दबावाखाली न जाता त्यांच्या दडपशाहीला न जुमानता घटनात्मक तत्त्वांचा विचार करून ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा समस्त ओबीसी समाज नंदुरबार जिल्ह्यासह रस्त्यावर उतरून तीव्रप स्वरूपाचे आंदोलन उभारण्यास प्रवृत्त होईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनाद्वारे शिदखेडा तालुका अध्यक्ष गणेश खलाणे यांनी केलला आहे यावेळी समता समता परिषदेचे जिल्हा सचिव बापू महाजन भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन समता परिषद नंदुरबार जिल्हा उपाध्यक्षविनोद अहिरे, शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष भगवान माळी समता परिषद धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,रोहिदास खलाने,भटक्या जातीजमाती प्रदेश संघटक साहेबराव गोसावी,योगेश बोरसे,शांतीलाल वाघ,मनोज महाले,शंकर जाधव,एकनाथ माळी, सोनू देशमुख,भालचंद्र माळी,मच्छिंद्र जाधव,जगदीश सूर्यवंशी पुरुषोत्तम गोसावी,संदीप केशे, सुभाष गिरासे किशोर देशमुख,हिरालाल अहिरे,विलास गोसावी,मोहित महाले,धनंजय चित्ते, मुरलीधर महाजन, बिलाल बागवान,वासुदेव माळी,तुकाराम माळी, शिंदखेडा शहर अध्यक्ष कैलास वाघ,राजेश माळी,आदी समता पदाधिकारी व समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव यावेळी उपस्थित होते
Tags
