नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये तीव्र आंदोलन छेडलं आहे. नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर ‘रेल रोको’ आंदोलन करत प्रहार कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, 'जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील'.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
आज सकाळपासूनच नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते जमले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, थकलेली कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्याच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून नागपूर-मुंबई मुख्य मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प केली आहे. यामुळे नागपूरहून मुंबईकडे आणि विदर्भातील इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 'सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही मुंबईला जाणार नाही. उलट सरकारने नागपूरला यावं आणि येथेच चर्चेद्वारे निर्णय घ्यावा.' त्यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलं की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असूनही, विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहेत.'
