संत गाडगेबाबा–क्रांतीच्या नाना पाटील पत्रीसरकार घ्या भूमीत शैक्षणिक सेवायज्ञशरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विखरण शाळेत 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

फुले शाहू आंबेडकर
0
संत गाडगे बाबा आणि क्रांतीसिंह नाना पाटील उर्फ पत्री सरकार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विखरण गावात समाजोपयोगी उपक्रमातून शिक्षणाचा दीप उजळवण्यात आला. ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा, विखरण येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील तब्बल 150 विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी दिलीप बापू भाईदास पाटील व ज्ञानेश्वर धुडकु पाटील (तालुका सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिरपूर) यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप भाईदास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष),
ज्ञानेश्वर धुडकु पाटील (तालुका सचिव),
केतन दोरीक (नवे भामपुर),
विजय नारायण पाटील (विविध कार्यकारी सोसायटी सदस्य),
गंगाराम पावरा (माजी सरपंच, मुखेढ),
राजेंद्र साहेबराव पाटील (बलकुवा, सामाजिक कार्यकर्ता – राष्ट्रवादी काँग्रेस),
रोहित कुमार पाटोळे,
तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सातत्याने राबविले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम विखरण गावात कौतुकाचा विषय ठरला असून पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default