या उपक्रमांतर्गत शाळेतील तब्बल 150 विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी दिलीप बापू भाईदास पाटील व ज्ञानेश्वर धुडकु पाटील (तालुका सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिरपूर) यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप भाईदास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष),
ज्ञानेश्वर धुडकु पाटील (तालुका सचिव),
केतन दोरीक (नवे भामपुर),विजय नारायण पाटील (विविध कार्यकारी सोसायटी सदस्य),गंगाराम पावरा (माजी सरपंच, मुखेढ),राजेंद्र साहेबराव पाटील (बलकुवा, सामाजिक कार्यकर्ता – राष्ट्रवादी काँग्रेस),रोहित कुमार पाटोळे,तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सातत्याने राबविले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
