कामावरून परतताना मृत्यूची वाट पाहत होता
युनियन बँक ऑफ इंडियात असिस्टंट मॅनेजर असलेल्या भुवनेश्वरी (39) या रोजच्या प्रमाणे ऑफिसहून घरी निघाल्या होत्या. सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मगाडी रोड परिसरात अचानक तिच्या समोर पती बालामुरुगन (40) उभा ठाकला.
क्षणाचाही विचार न करता त्याने पिस्तुल बाहेर काढली…
धाड्! धाड्! धाड्! धाड्!
चार गोळ्या — अगदी जवळून!
रस्त्यावरच ती कोसळली… रक्ताच्या थारोळ्यात
रुग्णालयात पोहोचण्याआधीच संपलं आयुष्य
घाबरलेल्या नागरिकांनी भुवनेश्वरी यांना तातडीने शानबाग रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच एकच वाक्य उच्चारलं —ऐ
“डेड ऑन अरायव्हल.”
वेड पत्नीवर नजर आणि पूर्वनियोजित कट
पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, बालामुरुगनला पत्नीच्या चारित्र्यावर अतीव संशय होता. २०११ मध्ये लग्न झालेलं हे जोडपं गेल्या १८ महिन्यांपासून वेगळं राहत होतं. दोन मुलांचे आई-वडील असतानाही संसार तुटला.
भुवनेश्वरी पतीपासून दूर राहण्यासाठी व्हाईटफिल्डहून राजाजीनगर येथे स्थलांतरित झाली. पण बालामुरुगन थांबला नाही.
तो तिचा पत्ता शोधून काढतो…
तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच तिच्याच परिसरात राहायला येतो…
आणि योग्य क्षणाची वाट पाहतो!
घटस्फोटाची नोटीस… आणि मग गोळ्यांचा ‘उत्तर’
धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या अवघ्या आठवडाभर आधीच बालामुरुगनने पत्नीला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवली होती. नोटीसचा निकाल नको, तर रक्तरंजित शेवटच हवा होता, अशी भीषण मानसिकता त्यामागे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
ह्त्या करून थेट पोलीस ठाण्यात
पत्नीचा रक्ताने माखलेला चेहरा मागे सोडून बालामुरुगन थेट मगाडी रोड पोलीस ठाण्यात गेला.
“मी तिला गोळ्या घातल्या,” असं सांगत त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
हत्येसाठी वापरलेलं पिस्तुलही जप्त करण्यात आलं आहे.
बेरोजगार इंजिनीअर, संतापाची ठिणगी
बालामुरुगन पूर्वी खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. मात्र चार वर्षांपासून बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक ताण, मानसिक अस्थिरता आणि संशयाचं वेड — याचा स्फोट म्हणजे ही हत्या असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट होत आहे.
बीएनएस कलम 103 अंतर्गत गुन्हा
पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता का, शस्त्र कुठून मिळालं, याचा तपास सुरू आहे.
संशय जेव्हा प्रेमाला गिळतो, तेव्हा नात्यांचा शेवट रक्तातच होतो — बेंगळुरूतील ही घटना त्याची जिवंत उदाहरण आहे

