समाजहिताला अग्रक्रम देणाऱ्या नेतृत्वाचा वारसा जपत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बलकुवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक 13 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या उपक्रमात शाळेतील तब्बल 70 विद्यार्थ्यांना बिस्किटे, पेन्सिली व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य राजेंद्र साहेबराव पाटील (बलकुवा) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.
सामाजिक बांधिलकीचा ठसा
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष, शिरपूर),मोहन दौलत कोळी (तालुका उपाध्यक्ष, शिरपूर),
माधवराव दोरिक (ज्येष्ठ नागरिक, बलकुवा),
किशोर सुखलाल पाटील (सरपंच, बलकुवा),
सुभाष तोताराम पाटील (सामाजिक कार्यकर्ता),
नथ्थू सखाराम पाटील (विविध कार्यकारी सोसायटी, माजी चेअरमन),राहुल रमेश पाटील (सामाजिक कार्यकर्ता),
प्रदीप दोरिक,चेतन दोरिक (नवेभामपूर, राष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्ता),राकेश रमेश पाटील (सामाजिक कार्यकर्ता) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले.
उपक्रमाचे कौतुक
शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता, विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणारा उपक्रम राबविल्याबद्दल परिसरातून समाधान आणि कौतुक व्यक्त करण्यात येत आहे

