शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मायेचा हात; अर्थे येथे 170 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

फुले शाहू आंबेडकर
0
अर्थे (ता. शिरपूर) | दि. 13 डिसेंबर
ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत अर्थे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शाळेतील तब्बल 170 विद्यार्थ्यांना बिस्किटे, पेन्सिली व वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य मोहन दौलत कोळी, अ‍ॅड. रोहित कुमार पाटोळे व मनिष पाटील यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साहाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष व्यंकटेश हिलाल पाटील, विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील (शिरपूर), उपाध्यक्ष मच्छिंद्र वंजी गुजर, तालुका सचिव ज्ञानेश्वर धुडकू पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन दौलत कोळी, राजेंद्र साहेबराव पाटील (बलकुवा) आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या वतीने भारती देविदास ढोले (मुख्याध्यापक, जि.प. शाळा, अर्थे), शिक्षक विश्वास चंद्रशेखर पवार, सुनिता सुरेश पाटील, वर्षा उमाकांत पाटील यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी शरद पवार साहेबांच्या समाजाभिमुख नेतृत्वाचा आदर्श पुढे नेत शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव निर्माण करणारा ठरला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default