विखरणमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनांची दिमाखदार कार्यक्रम आयोजित

फुले शाहू आंबेडकर
0
विखरण/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विखरण ग्रामपंचायतीत आज सामाजिक सलोखा आणि परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सरपंच रुपालीताई कवरदास पाटिल यांच्या पुढाकाराने गावातील मान्यवरांनी स्मारकस्थळी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
सरपंच रुपालीताईंबरोबरच कवरदास भाईदास पाटिल, दिलीप भाईदास पाटिल, शिरपूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट तसेच ग्रामसेवक धनराज अभिमन्यु पाटिल आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जगत सुखा पाटिल यांनीही उपस्थित राहून सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांना सलाम ठोकला.
कार्यक्रमादरम्यान गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. प्रविण जगन्नाथ पाटिल (माजी सरपंच), धोंडु झिंगा पाटिल (वि.वि.ध. कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष), लहु दगा धनगर जेष्ठ नागरिक भाऊराव दला पवार माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे विक्रम पवार, बैधनाथ गोडसे, भैया पवार, कैलाश शिंदे, छोटू पाटिल, विलास पाटिल, सत्तार खाटिक, वसंत पवार, दगा जिभाऊ, लोटन पाटिल यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला बळ दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हता, तर बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण व सामाजिक बांधिलकीचा नवा संकल्प ठरला. गावकऱ्यांनी एकजुटीने जागरूकता आणि प्रगतीचा संदेश देत मानवतेची मशाल उंचावली.
विखरण ग्रामपंचायतीचा हा उपक्रम गावाच्या प्रगतीशील विचारसरणीचे प्रतीक ठरला असून पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default