नणंदेची किंकाळी आणि उघड झाला मध्यरात्रीचा थरार!”चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून केला खून — पंचवटी हादरलं!

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक | पंचवटी परिसर
पंचवटीत मध्यरात्री उलगडलेल्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय बाळगणाऱ्या नितीन भामरे या संशयित पतीने स्वतःच्या पत्नीचा क्रूरपणे गळा आवळून खून केला आणि घराला बाहेरून कडी लावून फरार झाला. ३२ वर्षीय शीतल भामरे यांचा मृतदेह नणंदेला दिसताच तिच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.
मध्यरात्रीचा वाद… आणि थरकाप उडवणारा शेवट
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आणि शीतल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत होते. गुरुवारी रात्री पुन्हा संतापाच्या भरात नितीनने शीतलवर मारहाण केली. रागाच्या भरात त्याने दोरीने शीतलचा गळा आवळला आणि जागीच तिचा जीव घेतला.
क्रौर्य इतकं की, खून केल्यानंतर आरोपी शांतपणे घराला बाहेरून कडी लावून पळून गेला.
बाहेरून लावलेली कडी पाहून नणंदेला बसला धक्का
मध्यरात्री शीतलच्या नणंदेने दरवाजा बाहेरून बंद असल्याचं पाहिलं. संशय आल्याने तिने कडी उघडून घरात प्रवेश केला. आत पाहताच तिचे पाय थिजले—शीतल जमीनिवर मृतावस्थेत!
क्षणात संपूर्ण घर दणाणून गेलं. नणंदेच्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लोक धावून आले आणि पोलिसांना कळवण्यात आलं.
पोलिसांची धाव, पंचनामा आणि आरोपीचा शोधमोहीम
पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नितीन भामरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून पट्टय़ापट्टीसह परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
शेजाऱ्यांमध्ये भीतीचं सावट
घटनेनंतर पंचवटी परिसरात दहशत पसरली आहे.
"दोघांच्यात भांडणं नेहमीचीच… पण एवढं भयानक काही करेल, कुणालाच वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी दिली.
पोलिसांचे आवाहन
“नितीन भामरे हा फरार असून त्याचे कोणतेही ठसे मिळाल्यास त्वरित पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default