धडगाव तालुक्यातील निगदी फाटा परिसरात निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध विदेशी दारूविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान पिकअप वाहनातून वाहतूक केली जाणारी 200 बॉक्स विदेशी दारू पथकाने जप्त केली होती. मात्र कारवाई सुरू असतानाच अचानक परिस्थितीने धोकादायक वळण घेतले.
बुधा झांगडे, सुरेश झांगडे यांच्यासह 10 ते 12 जणांचा जमाव घटनास्थळी धावून आला.
“वाहन पुढे नेलंत तर जिवंत सोडणार नाही!” अशी धमकी देत आरोपींनी पथकाला घेरले आणि जोरदार दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेला दारूसाठा आणि वाहन हिसकावून घेत अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धडगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
कायद्याचा धाक संपलाय का? असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली आहे. अवैध दारूविरोधात कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने थेट हल्ला करत दगडफेक केली. इतकंच नव्हे तर जप्त केलेला 19 लाख 40 हजार रुपयांचा दारूसाठा आणि पिकअप वाहन बळजबरीने हिसकावून तस्कर फरार झाले.
निगदी फाटा परिसरात निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला होता. कारवाईदरम्यान 200 बॉक्स विदेशी दारू आणि वाहन जप्त करण्यात आले. मात्र काही वेळातच बुधा झांगडे, सुरेश झांगडे यांच्यासह 10 ते 12 जणांचा जमाव घटनास्थळी पोहोचला.
“वाहन पुढे नेलंत तर जिवंत सोडणार नाही!” अशी धमकी देत आरोपींनी जोरदार दगडफेक सुरू केली. अचानक निर्माण झालेल्या गोंधळात तस्करांनी मुद्देमाल पळवून नेला. या प्रकारामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
