धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत शहराच्या राजकारणावर घट्ट पकड मजबूत केली आहे. बिनविरोध चार जागांसह तब्बल ५० जागांवर विजय मिळवत भाजप पुन्हा एकदा धुळ्याचा ‘मोठा भाऊ’ ठरला आहे. ‘५५ प्लस’चे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ भाजपने सहजपणे पार केले आहे. त्यामुळे आगामी काळात धुळे महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
या निवडणुकीत भाजपने संघटनशक्ती, बूथ व्यवस्थापन आणि स्थानिक नेतृत्वाच्या जोरावर विरोधकांना मागे टाकले. काही प्रभागांमध्ये लढत अटीतटीची असली, तरी निकालात भाजपचे पारडे जड ठरले. चार जागा बिनविरोध जिंकत भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतली आणि मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आपले वर्चस्व कायम ठेवले.
प्रभागनिहाय चित्र :
प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १६, १७ व १८ या प्रभागांमध्ये भाजपाने निर्णायक विजय मिळवला. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाजपसोबत विजयी झाले, तर काही जागा बिनविरोध आल्याने भाजपचा विजयमार्ग अधिकच सुकर झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला प्रभाग क्रमांक ४ व १३ मध्ये यश मिळाले, तर एमआयएम ने प्रभाग क्रमांक १४, १५ व १९ मध्ये आपली ताकद दाखवली. मात्र एकूणच चित्र पाहता, विरोधी पक्ष भाजपसमोर टिकाव धरू शकले नाहीत.
राजकीय संदेश स्पष्ट
या निकालातून धुळ्यात भाजपची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास आणि विरोधकांची विखुरलेली रणनीती स्पष्टपणे दिसून आली. आगामी महापालिका कारभारात भाजपचे महापौर, स्थायी समिती व विविध समित्यांवर निर्विवाद वर्चस्व राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
शहराच्या विकासाची अपेक्षा
भाजपच्या या दणदणीत विजयामुळे आता धुळे शहराच्या विकासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि स्मार्ट सिटीशी संबंधित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, धुळे महापालिकेच्या रणांगणात भाजपने पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलवत सत्ता आपल्या मुठीत घेतली असून, शहराच्या राजकारणात भाजपचाच दबदबा कायम राहिला आहे.
धुळे महापालिका निवडणूक 2026
वार्डनिहाय निकाल व विजयी उमेदवार
वार्ड क्रमांक 1
सुभाष जगताप – भाजप
ललित माळी – भाजप
योगिता कुटे – भाजप
उज्वला भोसले – भाजप (बिनविरोध)
वार्ड क्रमांक 2
निशा महाजन – भाजप
नंदू सोनार – भाजप
कविता सोनवणे – भाजप
प्रभावती शिंदे – भाजप
वार्ड क्रमांक 3
देवेंद्र सोनार – भाजप
मीनाला परदेशी – भाजप
शोभा भील – भाजप
सनी चौधरी – भाजप
वार्ड क्रमांक 4
शेख शहनाज बी गुलाम खाटीक – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शेख तोहीम अनम – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अन्सारी इरफान अहमद फजलू रहमान – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
प्रवीण बानू शेख रफीक – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
वार्ड क्रमांक 5
संध्या कदम – भाजप
कांबळे नागेश बोरसे – भाजप
प्रतिभा चौधरी – भाजप
रुपेश नांद्रे – भाजप
वार्ड क्रमांक 6
कमलेश देवरे – भाजप
भगवान गवळी – भाजप
वैभवी दुसाने – भाजप
ज्योत्स्ना पाटील – भाजप (बिनविरोध)
वार्ड क्रमांक 7
वंदना भामरे – भाजप
विजय देवरे – भाजप
रूपाली पाटील – भाजप
रंगनाथ ठाकरे – भाजप
वार्ड क्रमांक 8
निलेश नेमाने – भाजप
उज्वला ठाकरे – भाजप
प्रियंका बोरसे – भाजप
छाया अहिरे – शिवसेना (शिंदे गट)
वार्ड क्रमांक 9
संजय जाधव – भाजप
प्रदीप बैरागी – भाजप
लताबाई सोनार – भाजप
पुनम शिरसाठ – भाजप
वार्ड क्रमांक 10
सुनील बैसाने – भाजप
किरणताई उलेवार – भाजप
ललित अहुजा – भाजप
प्रतिभा पाटील – भाजप
वार्ड क्रमांक 11
कल्पना महाले – भाजप
मायादेवी परदेशी – भाजप
रोहित चांदोरे – भाजप
चेतन गवळी – भाजप
वार्ड क्रमांक 12
जयश्री अहिरराव – भाजप
छोटू थोरात – भाजप
प्रतीक करपे – भाजप
शीतल वाघ – भाजप
वार्ड क्रमांक 13
शाह शाहबाज फारूक शहा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
फातिमा बी नूरुल आमीन – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शहा नजमा शफी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शेख मतीन लिखायत अहमद – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
वार्ड क्रमांक 14
मंसूरी मुक्तार कासिम – एमआयएम
हसीना बानो साजिद अली – एमआयएम
शेख शहाजान बिस्मिल्ला – एमआयएम
मिर्झा शोएब नवाब बेग – एमआयएम
वार्ड क्रमांक 15
अन्सारी अब्दुल लतीफ – एमआयएम
अन्सारी अमिरा बानो – एमआयएम
अन्सारी हलीमा बानो – एमआयएम
युसुफ मुल्ला – एमआयएम
वार्ड क्रमांक 16
कल्याणी अंमळकर – भाजप
पुष्पा पवार – भाजप
धीरज परदेशी – भाजप
दीपक खोपडे – भाजप
वार्ड क्रमांक 17
धीरज कलंत्री – शिवसेना (शिंदे गट)
गीता नवले – शिवसेना (शिंदे गट)
अमोल मासुळे – भाजप (बिनविरोध)
सुरेखा उगले – भाजप (बिनविरोध)
वार्ड क्रमांक 18
चित्रलेखा परदेशी – भाजप
सारिका अग्रवाल – भाजप
मंगला सोनवणे – भाजप
(एक जागा) – शिवसेना (शिंदे गट)
वार्ड क्रमांक 19
अमीर पठाण – एमआयएम
पिंजारी मदिना – एमआयएम
समशेर रऊफ पठाण – अपक्ष
