ज्या संविधानामुळे भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही ठरली, त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावच प्रजासत्ताक दिनाच्या मंचावरून गायब राहिल्याने नाशिकमध्ये वादाचा भडका उडाला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर अवघ्या काही सेकंदांत महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी उभ्या सभेतच बंड पुकारले आणि क्षणातच हा कार्यक्रम राजकीय रणांगणात बदलला.
मंचावरच ‘थांबा!’ – मंत्र्यांना थेट जाब
ध्वजारोहनानंतर गिरीश महाजन यांनी भाषण करताना घोषणा दिल्या, जयघोष झाला, टाळ्या वाजल्या…
पण ज्यांच्या नावावर प्रजासत्ताक दिन उभा आहे, त्या बाबासाहेबांचा उल्लेख न झाल्याने माधवी जाधव यांचा संयम तुटला.
“संविधानामुळे तुम्ही मंत्री आहात, आम्ही कर्मचारी आहोत. मग बाबासाहेबांचं नाव का नाही?”
हा प्रश्न थेट मंत्र्यांच्या दिशेने झेपावला.
‘सस्पेंड करा, पण बाबासाहेब पुसू देणार नाही!’
माधवी जाधव यांनी कोणतीही भीड न ठेवता आक्रमक भूमिका घेतली—
“मला निलंबित करा, मला नोकरीची भीती नाही. मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख संपवायचं काम होऊ देणार नाही!”
सभास्थळी क्षणभर शांतता, त्यानंतर गोंधळ…
वरिष्ठ अधिकारी त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र माधवी जाधव माघार घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
मंत्री महाजनांची दिलगिरी, पण संशय कायम
प्रकरण पेटल्यानंतर गिरीश महाजन यांनी खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली—
“अनावधानाने बाबासाहेबांचं नाव राहिलं असेल. हेतू नव्हता.”
मात्र हा खुलासा राजकीय आणि सामाजिक स्तरावर अपुरा ठरत असल्याचं चित्र आहे.
विरोधक आक्रमक – ‘हा अपमान आहे’
या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
▪ शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे –
“भाजप संविधान मानत नाही, हे पुन्हा सिद्ध झालं.”
▪ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर –
माधवी जाधव यांच्याशी थेट संपर्क, अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
▪ ओबीसी नेते लक्ष्मण हाके –
“गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा” अशी थेट मागणी
पोलीस तक्रार – प्रकरण गंभीर वळणावर
वाद शाब्दिक मर्यादेत न राहता कायदेशीर टप्प्यावर पोहोचला आहे.
महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हा केवळ वाद नाही, हा इशारा आहे!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव केवळ इतिहास नाही,
ते संविधान, हक्क, समानता आणि लोकशाहीचं प्रतीक आहे.
प्रजासत्ताक दिनासारख्या दिवशी त्यांचा उल्लेख न होणं
👉 चूक आहे की दुर्लक्ष?
👉 अनवधान आहे की विचारधारा?
हा प्रश्न आता नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नाही.
तो थेट राज्याच्या राजकारणाला हादरा देणारा ठरतोय.
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी नाशिकमध्ये घडलेली एक घटना सध्या राज्यभरात राजकीय व सामाजिक वादाला तोंड फोडत आहे. ध्वजारोहनाच्या मंचावरून भाषण करताना राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने मंत्री गिरीश महाजन अडचणीत सापडले, तर एका महिला वनरक्षकाच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण कार्यक्रमच हादरून गेला.
नेमकं घडलं काय?
नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र भाषणात “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देण्यात आल्या, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला गेल्याचा आरोप झाला.
याच क्षणी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी जागेवरूनच मंत्र्यांना जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली. क्षणातच शांत वातावरण तापले.
‘सस्पेंड करा, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही’
माधवी जाधव यांनी कोणतीही भीड न ठेवता संतप्त शब्दांत भूमिका मांडली.
“बाबासाहेब संविधानाला कारणीभूत आहेत. त्यांचं नाव पुसण्याचं काम चाललं आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी माती काम करेन, वाळूच्या गाड्या उपसेन; पण बाबासाहेबांची ओळख संपवू देणार नाही!”
त्या पुढे म्हणाल्या—
“संविधानामुळे तुम्ही मंत्री आहात, आम्ही कर्मचारी आहोत. समानता, लोकशाही, हक्क—हे सगळं बाबासाहेबांनी दिलं. मग प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात त्यांचं नाव का नाही?”
त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र माधवी जाधव माघार घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
मंत्री महाजनांची दिलगिरी, पण वाद शांत होईना
घटनेनंतर वाढलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी दलगिरी व्यक्त करत खुलासा केला.
“अनावधानाने बाबासाहेबांचं नाव राहिलं असेल. कुठलाही हेतू नव्हता. प्रत्येक वेळी असं होत नाही. कुणाला दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
मात्र हा खुलासा विरोधकांना समाधान देणारा ठरला नाही.
विरोधक आक्रमक, राजकीय आरोप-प्रत्यारोप
या घटनेनंतर गिरीश महाजन थेट विरोधकांच्या रडारवर आले.
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी
“भाजप संविधान मानत नाही,” अशी घणाघाती टीका केली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांना फोन करून पाठिंबा दर्शवला आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली.
पोलीस तक्रार, प्रकरण आणखी गंभीर
वाद एवढ्यावरच थांबला नाही.
वनरक्षक माधवी जाधव यांनी नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
यामुळे हे प्रकरण आता फक्त भाषणापुरतं न राहता कायदेशीर व राजकीय वळणावर पोहोचलं आहे.
नाशिकचा वाद – राज्यासाठी इशारा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून संविधान, लोकशाही आणि समानतेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख न होणं हे चुकून झालं की जाणीवपूर्वक, यावर वाद असू शकतो; मात्र प्रजासत्ताक दिनाच्या मंचावर उभा राहिलेला हा प्रश्न आता राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट ठरतोय.
