संविधानाचा जयघोष, देशभक्तीचा उद्गार!शहाद्यात कामगार कल्याण केंद्रात ७७ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

फुले शाहू आंबेडकर
0
शहादा /प्रतिनिधी:( जितेंद्र बोरसे) 
“संविधान हीच देशाची खरी ओळख” या भावनेने भारलेल्या वातावरणात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र, शहादा येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. राष्ट्रभक्ती, संविधाननिष्ठा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रभावी दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शहादा नगरपालिकेच्या नगरसेविका मा. सौ. ममता हेमराज पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजवंदन होताच परिसरात देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
यानंतर उपस्थित नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारा हा क्षण सर्वांसाठी भावनिक ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. गुलाबराव सोनवणे (गुणवंत कामगार) उपस्थित होते. तसेच मा. श्री. हेमराज पवार (स्वीय सहाय्यक), मा. श्री. विजय धनगर, मा. श्री. संदीप पाटील (एस.टी. महामंडळ), मा. श्री. रामकृष्ण शेवाळे, मा. श्री. शांतिलाल वासाईकर (महावितरण), मा. सौ. रंजना कोळी (एस.टी. महामंडळ, शहादा) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मार्गदर्शनपर भाषणात मा. श्री. हेमराज भाऊ पवार व मा. श्री. गुलाबराव सोनवणे यांनी संविधानाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. “संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते सामान्य माणसाच्या हक्कांचे संरक्षण करणारे शस्त्र आहे,” असे ठाम मत त्यांनी मांडले. उपस्थित सर्व नागरिकांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुस्पष्ट प्रास्ताविक कामगार कल्याण केंद्राचे सहाय्यक केंद्र संचालक श्री. अभिजित पेंढारकर यांनी केले. यावेळी केंद्र सेवक श्री. दिनेश दिसले व श्रीमती रुपाली थोरात यांच्यासह कामगार कल्याण केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे चहापानाने स्वागत करण्यात आले. संविधानप्रती निष्ठा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा शहाद्याच्या सामाजिक जीवनात ठळक ठसा उमटवणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default