अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, बारामतीत लँडिंगदरम्यान विमान कोसळलं

फुले शाहू आंबेडकर
0
मुंबई/  प्रतिनिधी : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागरी विमान उड्डाण नियामकने (DGCA) दिली.
DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये अजित पवार, त्यांचे स्वीय सहाय्यक, एक बॉडिगार्ड आणि दोन पायलट्सचा समावेश होता.
बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते.
यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेसाठी अजित पवार आज बारामती तालुक्यात सकाळी निरावागज येथे जाणार होते. त्यानंतर पणदरे, करंजेपूल, सुपा येथे त्यांच्या प्रचारासाठी भेटी आणि कार्यक्रम होणार होते
हे विमान VTSSK, LJ45 प्रकारचं चार्टर विमान होतं आणि मुंबईहून बारामतीला जात होतं.
बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला. चचच
लियरजेट- 45 (LJ45) हे मध्यम आकाराचे विमान बिझनेस जेट किंवा चार्टर फ्लाईट म्हणून वापरले जाते. कॅनेडियन विमान कंपनी बॅाम्बार्डिएरनं तयार केलेली लियरजेट विमानं अनेक चार्टर कंपन्यांद्वारा वापरली जातात. या विमानांत दोन हनीवेल TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो आणि एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात. साधारण तीन हजार किलोमीटर रेंजमध्ये वेगानं प्रवास करू शकणारं विमान म्हणून ते ओळखले जाते.
बारामतीत कोसळलेलं लियरजेट 45 हे विमान 2010 पासून सेवेत होतं, म्हणजे ते सोळा वर्ष जुने होते.
'अविश्वसनीय - निःशब्द....सुन्न... भयानक...'
अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. 'अजितदादांची बातमी अविश्वसनीय - निःशब्द....सुन्न... भयानक...' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
सविस्तर बातमी तयार करण्यात यावी पेपर साठी कोणत्याही प्रकारची कॉपी राईट नको सनसनाटी शिर्षक सह क्राईम न्यूज धारदार शैली नुसार सविस्तर बातमी तयार करण्यात यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default