महाराष्ट्र-गुजरात सीमेवर पुन्हा एकदा वनसंपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पेठ-हरसूल वनपरिक्षेत्रातील रायता परिसरात वन विकास महामंडळाच्या दक्षता पथकाने धडक कारवाई करत खैर लाकडांची तस्करी उधळून लावली. या कारवाईदरम्यान तस्करीसाठी वापरण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन आणि खैराचे लाकूड जप्त करण्यात आले असून, तस्कर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या ओझरखेड आणि सूलिया गावांच्या दरम्यान संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती वनपथकाला मिळाली होती. त्यानुसार वन विकास महामंडळाच्या दक्षता पथकाने सापळा रचत संशयित वाहनाची तपासणी केली. झडतीदरम्यान वाहनामध्ये खैराचे ६ नग लाकूड (सुमारे ०.०८७ घनमीटर) आढळून आले.
तस्करीसाठी वापरण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन तसेच खैराचे लाकूड वनपथकाने तातडीने जप्त केले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच तस्करांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम २६ (१) (इ), (ड), (फ) तसेच कलम ५२ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात एकूण पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यापैकी तीन आरोपी गुजरात राज्यातील असल्याचे समोर आले आहे.
वन विभागाच्या सूत्रांनुसार, सीमेलगतच्या भागात खैर लाकडांची तस्करी करण्यासाठी काही टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त
केला जात असून, या प्रकरणाच्या अनुषंगाने तस्करांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
केला जात असून, या प्रकरणाच्या अनुषंगाने तस्करांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई वन विकास महामंडळाचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे आणि सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाने केली.
दरम्यान, वनसंपत्तीची तस्करी रोखण्यासाठी सीमाभागात गस्त वाढवण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले

