सरकारी यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराला मोठा झटका देणारा धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. अंगणवाडी बांधकाम प्रकरणात ठेकेदाराकडून केवळ १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने आरोपी पंकज विक्रम पाटील याला दोषी ठरवत प्रत्येकी ३ वर्षे सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
“लाच घेताना रंगेहाथ पकडला” – प्रकरणाचा थरार
ही घटना शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील अंगणवाडी बांधकामाशी संबंधित आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली होती. या नोटीसमुळे ठेकेदारावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार होती.
याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तत्कालीन प्रभारी अधीक्षक पंकज पाटील याने ठेकेदाराला “प्रकरण मिटवून देतो” असे सांगत १० हजार रुपयांची लाच मागितली.
१६ सप्टेंबर २०१६ रोजी, लाच स्वीकारताना सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले, आणि त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास, पुरावे आणि कोर्टात सरकारची भक्कम बाजू
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केला. तपासानंतर सशक्त पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्र तवर आणि

