नाशिक हादरलं! ‘लग्न’चं आमिष, गुप्त फोटो आणि ब्लॅकमेलिंग… तरुणीवर महिनोन्‌महिने अत्याचाराचा थरार

फुले शाहू आंबेडकर
0
त्र्यंबकेश्वर (नाशिक) – पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका २४ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एजाज पठाण या संशयिताने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. मात्र, विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
गुप्त फोटो काढून ब्लॅकमेलिंगचा सापळा
तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेचे कपडे बदलतानाचे फोटो चोरून काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यात आले. “फोटो सोशल मीडियावर टाकीन” अशी भीती दाखवत आरोपीने पीडितेवर मानसिक दबाव निर्माण केला आणि वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
 हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार
खंबाळे परिसरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन पीडितेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे. या घटनांमुळे पीडितेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
कायदेशीर कारवाई सुरू
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(१), ६४(२)(m), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खैरनार पुढील तपास करत आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके सक्रिय झाली आहेत.
 परिसरात भीतीचं वातावरण
या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default