विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृक्षरोपणातून पर्यावरणाचा संदेश; आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावलमध्ये सामाजिक उपक्रम

फुले शाहू आंबेडकर
0

यावल | प्रतिनिधी ( सुधाकर धनगर) :- 
रावेर-यावल मतदारसंघाचे लोकनेते तथा आमदार अमोल (दादा) जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावल येथील श्री तारकेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व तारकेश्वर माध्यमिक विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तर वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
आमदार अमोल जावळे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने वृक्षरोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला.
रावेर-यावल मतदारसंघातील विकासकामे, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी यामुळे आमदार अमोल जावळे यांनी कार्यकर्ते व नागरिकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. शेतकरी हितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत असल्याची भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी नगरसेविका शुभांगी रोशन येवले, डॉ. युवराज चौधरी, किशोर कुलकर्णी, जितू कोळी, मुकेश कोळी, बबलू घारू, विजू कासार, विजू गजरे, सुधाकर धनगर, वेंकटेश बारी, अतुल चौधरी, रोशन येवले, पिंटू फेगडे तसेच तारकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default