नागपूर: लग्नात नाचत असताना झालेल्या वादातून एका युवकाची १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या केली असल्याची धक्कादायक गटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी
(Police) दिलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल शहरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात घडली. राहुल श्रावण गायकवाड (वय २७, रा, अण्णाभाऊ साठेनगर)
असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. राहुल आणि एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा हे या परिसरातील एका लग्नात नाचत होते. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. या मुलाने राहुलच्या छातीवर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
