धक्कादायक! स्वयंपाक येत नाही म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

फुले शाहू आंबेडकर
0


 नाशिक : लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे. पती-पत्नींनी एकत्र गुण्यागोविंदानं नांदावं, असे अनेक नातेवाईक लग्नात येऊन आशीर्वाद देत असतात. मात्र, सध्या जोडप्यांमधील घरगुती वाद वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच नाशिकमध्ये घरगुती वादाचा भीषण प्रकार समोर आला आहे. स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये  एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्येचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर हत्येप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या औरंगाबाद रोड येथील माडसांगवी या विभागात विशाल कापसे व त्याची पत्नी आरतीही सोबत राहायची. त्या दोघांचे लग्न २०१६ साली झालं होतं. विशाल आणि आरतीला ३ मुलं आहेत. लग्न झाल्यापासून दोघांचे आपापसात नेहमी वाद व्हायचे. अनेक क्षुल्लक कारणांवरून दोघे एकमेकांशी भांडायचे. काल रात्री या दोघांचे वाद विकोपाला गेले. पती विशाल कापसेनं आरतीला स्वयंपाक येत नाही, यावरून वाद घालायला सुरुवात केली. या वादात विशालनं आरतीच्या डोक्यात दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण एवढी जबर होती की, त्यातच पत्नी आरतीचा मृत्यू झाला. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर हत्येप्रकरणी पती विशाल, त्याचा भाऊ, काका आणि काकीसह ५ लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विशालला ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे.

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

दरम्यान, पत्नीवर नाराज असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरामध्ये घडली आहे. पत्नी मनासरखी मिळली नाही. तसेच, तिच्या सवयीसुद्धा आपल्याला पटत नाही. तिला साधी साडीही नीट नेसता येत नाही. 'आय क्विट', असे म्हणत या पतीने आत्महत्या केली आहे. अजय साबळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. २५ वर्षीय अजयच्या आत्महत्येनंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default