मिळालेल्या माहितीनुसार , सोलापूरच्या शेळगी परिसरात आई आणि मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सकाळपासून घरात सामसूम दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांचा घरात डोकावून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी नागरिकांना दोघेही साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सोलापुरात दोघेही गळफास घेतल्याचा अवस्थेत आढळून आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले आहे.शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
