याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गजानन याने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार 11 जानेवारी रोजी तिच्या पालकांनी माना पोलीस स्टेशन येथे दिली होती. माना पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी गजानन आणि अपहृत मुलगी यांना पोलिसांनी कर्नाटक मधून आणले.
दरम्यान मुख्य आरोपीला मदत करणारे योगेश वानखडे,मिलिंद खडसे,कैलास तायडे,अमोल चव्हाण यासह एक महिला या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यात संभाषणाकरीता वापरलेले मोबाईल व वापरलेले वाहन पुराव्या कामी जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील आरोपी गोलू तायडे याने पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी मुंबई,पुणे, उत्तर प्रदेश, झारखंड,ओरिसा आणि कर्नाटक या प्रत्येक ठिकाणी आपल्या मोबाईलचे सिम कार्ड बदलले.
