खदानीत बुडून पाच जणांचा मृत्यू; पाण्यासाठी अजूनही महिलांचा जीव धोक्यात ?

फुले शाहू आंबेडकर
0
डोंबिवली : संदप गावातील (Sandap village) खदानीत तलावात बुडून (Mine) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच घडली. परिसरात पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच जणांवर (Five people death) काळाने घाला घातला. ही घटना ताजी असतानाच येथील महिला कपडे धुण्यासाठी पुन्हा त्याच खदानीत जाऊन जीव धोक्यात टाकत आहेत. डोंबिवलीजवळ असलेल्या संदप,देसले पाडा ,भोपर गाव परिसरात पाणी टंचाईची समस्या (Water scarcity) तीव्र होत असल्याने महिलांना खदानीत जावं लागत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असून धोक्याची घंटा येथील ग्रामस्थांवर आजही कायम आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतील का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
दिसले गावचे सरपंच आणि पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांची आई, सून आणि तीन नातवंडं दुपारच्या वेळेस कपडे धुण्यासाठी तलावात गेले होते. तलावात काही लोकं बुडाल्याची माहिती साडेसहाच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर घटनेची खात्री करुन पाच मृतदेह फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. कुणीतरी एक जण त्या तलावात बुडाला असावा आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेले इतर लोकं तलावात बुडाले असावेत. अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलीय होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default