जिल्हा परिषद गट व दोन गणासाठी होत असलेल्या मतदान प्रक्रीयेत दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत दोन जागांसाठी पन्नास टक्के मतदान झाले आहे. तर जिल्हा परिषदेच्या चितवी गटासाठी दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास 35 टक्के मतदान झाले आहे. जिल्हा परिषद चितवी गटाची निवडणूक चुरशीची असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील सुरेश गावित व अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांच्यामध्ये सरळ लढत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे, नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी आदी अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे.
