शिवसेना आमदाराच्या अडचणीत वाढ, लता सोनवणेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले हाते. त्याविरोधात त्यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे आमदार सोनवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून आमदार लता सोनवणे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान दिले होते. आमदार सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने सोनवणे यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने याबाबत चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते.
समितीने पूर्वीचा निर्णय दिल्याने आमदार सोनवणे पुन्हा खंडपीठात गेल्या होत्या. आता खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ आहे.
खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणार

दरम्यान, आमदार लता सोनवणे खंडपीठाने याचिका फेटाळल्यानतंर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तशी तयारी सुरु केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default