अमोल मिटकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रमाणिकपणे काम करून महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना तर बाजूलाच ठेवले. तर केशव उपाध्ये हे भजन कीर्तनापुरते मर्यादित ठेवले. सर्व जुन्या चेहऱ्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली यावरून हे सिद्ध होते की, देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत. ते जाणीवपूर्वक या सर्वांना डावलत आहेत. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषद आणि राज्यसभेची उमेदवारी न देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपने विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी देण्याची चर्चा होती.
मात्र, त्यांना विधानपरिषदी उमेदवारी डावलल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या आरोपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
