मृतक राहुल हा काही कामानिमित्त गणेश नगरी परीसरात आपल्या दुचाकीने आला होता. दरम्यान, त्याच्या मागावर असलेल्या गुंडांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यामुळे तो खाली कोसळला. याचा फायदा घेत धारधार शास्त्राने त्याच्यावर सपासप वार करून त्याला ठार मारण्यात आले.
मिर्ची पूड टाकत धारदार शस्त्राने वार; भंडाऱ्यात इसमाची निर्घृण हत्या!
शनिवार, जून ११, २०२२
0
भंडारा: डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 30 वर्षीय इसमाचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या वरठी- भंडारा मार्गावरील गणेश नगरी जवळील राज्य मार्गावर उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव राहुल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (वय 30) रा. राजेन्द्र वार्ड टाकळी असे आहे.
Tags
