BSF जवानाच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

फुले शाहू आंबेडकर
0

वर्धा - मूळ वर्ध्यातील खुबगाव येथील बी एस एफ जवान शशिकांत राऊत यांनी गांधीनगर गुजरात बटालियन मध्ये बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घरच्यांना या घटनेची माहिती मिळल्यावर 31 मे ला राऊत कुटुंबियांना मोठा धक्काच बसला,शहीद शशिकांत यांना 25 वर्षांची पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आहे..शहीद जवानाचे पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र शशिकांतआत्महत्या करू शकत नाही अशी खात्री त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आहे.

कुटुंबियांना आत्महत्येचा फोटो पाठवण्यात आला ज्यात बाथरूम मधील हँगर ला गळफास लावून दिसतंय मात्र त्यावर दाट संशय आल्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा असल्याचेही कुटुंबीय सांगतात.त्यामुळे ही आत्महत्या असून घातपात आहे असा आरोप करत या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शशिकांतच्या भावंडांनी संबंधित बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर अधिकाऱ्यांच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती व तफावत होते असा आरोप शहीद जवानाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच इतर अनेक बाबी अशा शशिकांत याची आत्महत्या नसून घातपात झाला आहे या बाबीकडे दिशानिर्देश करतात.

या घटनेच्या सखोल तपास होऊन त्यामध्ये घातपाताच्या सर्व शक्यतांची तपासणी करून सर्व सत्य त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात यावी व जर या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असा आक्षेप देखील लेखी स्वरुपात बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे अशी तक्रार शहीद जवानाच्या कुटुंबियांनी भारत सरकारला लेखी स्वरूपात केलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default