ब्राऊन शुगरच्या 32 पुड्यांसह महिलेला अटक

फुले शाहू आंबेडकर
0
नागपुर : नागपुरातून तडीपार असलेल्या महिलेला कपिलनगर पोलिसांनी ब्राऊन शुगरच्या 32 पुड्यांसह अटक केली. तसेच तिच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली. यांच्यावर नागपूर  शहरात ड्रग्स विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चंदा ठाकूर आणि अब्दुल लतीफ असे या आरोपींची नावे आहेत 
चंदा ठाकूर आणि तिचा सहयोग अब्दुल लतीफ हे अनेक वर्षांपासून अमली पदार्थ तस्करीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे  सुद्धा दाखल आहेत. कपिलनगर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पुन्हा एकदा ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. कपिलनगर पोलीस रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगवर असताना त्यांना एक संशयित गाडी आढळून आली. त्या गाडीचा पाठलाग केला असता ती थांबत नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी पाठलाग सुरू केला.

रात्री पोहचविल्‍या ग्राहकांपर्यंत

पुढे जाऊन त्या गाडीला थांबवले असता त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष मिळून आला. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ ब्राऊन शुगरच्या 32 पुड्या मिळाल्या. त्यांना विचारपूस केली असता आम्ही हे ग्राहकांपर्यंत पोहचवत इथपर्यंत आलो असल्याच त्यांनी सांगितले. मात्र कोणाला दिल्या हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितले नाही. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default