धुळे येथे आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0
पिंपळनेर (धुळे) : चिंचपाडा पो. बोदगाव (ता. साक्री) येथील रहिवासी व पांगण (ता. साक्री) येथील आश्रम शाळेतील शिक्षकाने आजाराला कंटाळून  आत्‍महत्‍या केली. कॅन्‍सर झाल्‍याने चार महिन्‍यांपुर्वीच ऑपरेशन झाले होते. परंतु, सुधारणा होत नसल्‍याने शिक्षकाने आत्‍महत्‍या केली
चिंचपाडा येथील छोटू झिपरु पवार (वय ५०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शिक्षकाचे नाव आहे. त्‍यांना मागील एक वर्षापासून जिभेचा कॅन्सर होता. त्यांचे चार महिन्यापूर्वी ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन करून देखील त्यांचा आजार बरा न झाल्याने त्यांच्या मानेला कॅन्सरच्या गाठी झाल्या.

विहिरीत उडी मारून संपविले जीवन

त्यांनी या आजाराला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नुक्ते यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत राजेंद्र पवार यांच्या माहितीनुसार पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default