आमदार किशोर पाटलांच्‍या समर्थनार्थ रॅली; घोषणांनी पाचोरा दणाणले

फुले शाहू आंबेडकर
0
पाचोरा येथील 'शिवतीर्थ' या शिवसेना कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ अभूतपूर्व रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात येऊन शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचे सभेत रूपांतर झाले
भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ पाचोरा  व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी काढलेल्या अभूतपूर्व रॅलीत समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी शहर दुमदुमले. आमदार किशोर पाटील सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे  यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यासाठी शिवालय या त्यांच्या संपर्क कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होवुन त्यात पाचोरा मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करत रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला होता.
आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक व जिवलग मित्र मुकुंद बिल्दीकर, युवा नेते सुमित पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर यांचेसह पदाधिकाऱ्यांनी भव्य रॅलीचे नियोजन करून रॅली यशस्वी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default