देह व्यापाऱ्याचा धंदा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; नागपूर पोलिसांची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : परराज्यातील मुलींना पैशाचे आमिष दाखवत त्यांना नागपुरात आणून हॉटेलमध्ये देह व्यापाऱ्याचा धंदा करणाऱ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. सदर परिसरात टाकलेल्या धाडीत एका मुलीची सुटका करण्यात आली; तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
परराज्यातील मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना नागपुरात  आणायचा. शहरातील ओयो हॉटेलचा वापर करून ग्राहक शोधत त्याच्याकडून देह व्यापार करायचा. त्यातून पैसे कमवायचे हा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये  गुजरातमधील एक मुलीला आणून तिच्याकडून देह व्यापार केला जात असल्याची टीप मिळाल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचला.

आरोपी ताब्‍यात

हॉटेलवर धाड टाकली असता त्या ठिकाणी एक मुलगी आढळून आली. त्‍या मुलीची सुटका करण्यात आली असून आरोपी रोशन डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने याआधी सुद्धा अनेक राज्यातील मुलींना आणून अशाप्रकारे व्यवसाय केल्याचे पुढे येत आहे. ओयो हॉटेल हे अशा लोकांसाठी एक ठिकाण बनले असल्याचे सुद्धा पुढे येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default