धुळे-शिंदखेडा रस्त्यावर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. तिहेरी अपघातात तीन जणांचा मृत्यू होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ट्रॅक्टर,ट्रक व दुचाकी या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. दुचाकी चालकाचा ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये चिरडलं गेल्यानं जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दोंडाई पोलिसांनी दखल घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-शिंदखेडा रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याने तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहने एकाच मार्गाने जात असताना ट्रॅक्टर अचानक थांबल्याने मागून येणारी दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली.
