देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडत आहेत. अशीच एक पेट्रोल चोरीची घटना विसरवाडी सारख्या ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयाजवळ शिवमंदिर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत पेट्रोल चोरीची घटना कैद झाली आहे. या ठिकाणी पेट्रोल चोरीसाठी हा चोरटा गेला आणि घरासमोर उभी मोटारसायकलीतून खाली बसून पेट्रोल चोरी करतानाचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पेट्रोल चोरीच्या घटनांमुळे गावकरी वैतागले; पोलिसांकडे केली मोठी मागणी
रविवार, जुलै २४, २०२२
0
नंदुरबार : जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीत भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी मोटरसायकलीतून पेट्रोल आणि सायकल चोरीच्या सातत्याने घटना घडत आहेत. विशेष म्हणजे यातील एक पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पेट्रोल चोरीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांकडून गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
Tags
