धक्कादायक! खेळायला बाहेर जातो असं सांगितलं, अन् तीन चिमुकल्यांना मृत्यूनं गाठलं

फुले शाहू आंबेडकर
0
जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तीन चिमुकल्यांवर काळाने घाला घातला आहे. बाहेर खेळण्यासाठी जातो असे सांगून डोहात पोहायला गेलेल्या तीन बालकांना मृत्यूनं गाठलं. डोहाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा  पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default