दोन हजाराची लाच; तहसिल कार्यालयातील शिपाई ताब्‍यात

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला  लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे  महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
जळगाव तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघनगर जळगाव) हे संगायो योजनेचे फार्म जमा करतात. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. घटस्फोटीत व निराधार असलेल्‍या तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी (२७ जुलै) त्यांच्याकडे आईचे काम करून तीन हजार व तक्रारदाराचे काम करून दोन हजार रूपये मागितले होते.

सापळा रचत पकडले

आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार रूपये मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार आज (२७ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला लाच स्‍वीकारताना ताब्यात घेतले. तक्रारदार मुलगी व आईसोबत वास्तव्यास आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default