रजाळे येथील डेमा ठेलारी यांच्या मेंढ्यांचा कळपा आपल्या शेतातच असल्याने रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक चार ते पाच लांडग्यांनी मेंढ्यांवर हल्ला चढविला. यात दहा मेंढ्या व एक कोकरू अशी ११ जनावरे फस्त केली आहेत. यामुळे ठेलारी कुटुंबियांमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात कोणीही नसल्याने कुटुंबियांवर घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने लांडग्याच्या हल्यात ते बचावले आहेत
दीड लाखाचे नुकसान
मेंढ्यांच्या कळपामध्ये १५० ते २०० मेंढ्या होत्या. यात ११ मेंढ्या लांडग्यांनी ठार केले आहे. यामुळे डेमा ठेलारी यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी तांबोळी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नाना पाटील, सावळीराम करिया, सिदा होडगर, डेमा ठेलारी आदी पंचनामा करतेवेळी उपस्थित होते. सदर घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
