मेहुणबारे : चाळीसगाव तालुक्यात बोगस डाँक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्यांचा अनेक भागात सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे येथे सापडून आलेल्या बोगस डॉक्टरांवर डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील आदींनी ही कारवाई केली.
पोलिस ठाण्यात जमा
मेहुणबारे परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टि. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुंमदार या चौघांवर आज कारवाई करून चौघांना या पथकाने मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा केले. या कारवाईने मेहुणबारे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.