वाय-फाय, लॅपटॉपच्या साह्याने गाडी चाेरी
त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मध्यप्रदेश ,राजस्थान या ठिकाणी गाडी संदर्भात चौकशी केली. त्यानंतर ही गाडी राजस्थान मधील चितोडगड येथील भांडारिया पुलाजवळ पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान आढळून आली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे जाऊन एका संशयीतासह गाडी ताब्यात घेऊन नाशिक येथे घेऊन आले. संशयित आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने वाय-फाय आणि लॅपटॉपच्या साह्याने गाडी चालू करून चोरी केल्याची माहिती दिली. तसेच या चोरीत आणखी दोघांचा समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
१४ दुचाकी हस्तगत
नाशिक शहरात एकीकडे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना दुचाकी चोरणारे चोरटे देखील सुसाट होते. शहरात दुचाकी चोरत धुमाकूळ घालणाऱ्या याच टोळीला चोरीच्या तब्बल १४ मोटार सायकलसह पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या होत्या. त्यामुळे शहरात दुचाकी धारकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आणि पोलिसांपुढे उभे राहिलं ते या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान हाेतं. त्यामुळे पोलीस प्रशासन या दुचाकी चोरांच्या मागावर होते. दुचाकी चोरीचे हे गुन्हे उघडकीस आणण्याचे सक्त निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले हाेते.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने प्रयत्न सुरू केले. दरम्यान चोरटे जळगाव जिल्ह्यात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केलं आहे. अमोल पाटील, विशाल पाटील, दिनेश पाटील, मल्हारी पाटील अशी पकडलेल्या संशयतांची नावं आहेत.
विशेष म्हणजे हे संशयित आरोपी उच्चशिक्षित असून ते फक्त हौस म्हणून मोटार सायकल चोरायचे. केवळ मौजमजेसाठी सातपूरच्या मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या पार्किंगमधील मोटार सायकल चोरून त्या अमळनेर (जिल्हा जळगाव) या ठिकाणी विकत असल्याची माहिती जयंत नाईकनवरे (पोलीस आयुक्त, नाशिक) यांनी दिली. दरम्यान दुचाकींचे हॅन्डलॉक तोडून दुचाकी चोरणाऱ्या या टोळीचे पोलिसांनी बेड्या ठोकून हँड लाॅक केले आहे.
