चोरी झालेल्या लोखंडी रॉडसह चोरटा ताब्‍यात अन्‍य साथीदारांचा शोध सुरू

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका लोखंडी रॉडच्या गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात लोखंडी रॉड चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती. याचा शोध घेत पोलिसांनी चोरट्यांना ताब्‍यात घेतले आहे
सदर चोरी संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास करत असताना तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले जवळपास 56 हजाराहून अधिकच्या किंमतीचे लोखंडी रॉड हस्तगत देखील केले आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्याने त्याच्या आणखी चार साथ साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे कबूल केले असून मोहाडी पोलीस आता फरार चौघा चोरट्यांचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default