नागपूरात खळबळ! पोलीस मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : नागपूरमध्ये खळबळ माजवणारी घटना घडली आहे. नागपूरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली आहे. शशिकुमार शेंडे  असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. आज दुपारी पोलीस मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून शेंडे यांनी जीवन संपवलं. शेंडे यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. शशिकुमार गेल्या तीन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. तसेच त्यांच्या पत्नीही पोलीस विभागात नोकरी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default