अनोळखी नंबरवरून महिलेच्‍या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ; पोलिसात तक्रार

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या गृहिणीला अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ तसेच फोटो पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताकडून या महिलेचा विनयभंग करण्यात आल्या प्रकरणी  सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली

जळगाव  सायबर पोलिसात दिलेल्‍या तक्रारीनुसार पिडीत महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने १५ जुलैला अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविला. तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. व्हिडीओ मॅसेज पाठवणारा मोबाईल (क्र. 9822609563) वरुन महिलेच्या नातेवाईकांना फोटो शेअर करुन महिलेची  बदनामी केली असून पिडीतेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default