जालना शहरातील इन्कमटॅक्स कॉलनी परिसरात एका विवाहित तरुणांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडालीय. अमोल सपकाळ (रा. जळगाव, ता भोकरदन) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
हत्या केल्याचा आरोप
अमोल सपकाळ यांच्या भावाने आणि वडिलांनी अमोल याची आत्महत्या नसून त्याचे व त्यांच्या पत्नीचे वाद असल्याने त्यांच्या पत्नीने व सासू सासऱ्यांनी त्यांची हत्या करून आत्महत्याचा बनाव केला असून ते फरार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी करत अमोलच्या पत्नीसह तिचे आई, वडील व भावाला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.
