मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन अज्ञात व्यक्ती अंबरनाथच्या हुतात्मा चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये आले होते. त्यानंतर एकाने हॉटेलमध्ये सिगरेट ओढण्यास सुरुवात केली. परंतु, फॅमिली हॉटेल असल्यामुळं वेटर काशिद आणि मालक मराडे यांनी त्या तरुणाला सिगरेट ओढण्यास मनाई केली. त्यानंतर त्या तरुणाने दोघांसोबत वादविवाद करत खिशात असलेल्या चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मराडे यांच्या हाताला आणि काशिदच्या पाठीला दुखापत झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सिगरेट ओढण्यास मनाई करणं महागात पडलं, हॉटेल मालकासह वेटरवर केला चाकूहल्ला
सोमवार, जुलै २५, २०२२
0
अंबरनाथ : हुतात्मा चौकात धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल मालकाने एका तरुणाला सिगरेट ओढण्यास मनाई केली. त्यानंतर रागाच्या भरात तरुणाने हॉटेल मालकासह वेटरवर चाकूहल्ला केला. अनिल मराडे असं हल्ला झालेल्या हॉटेल मालकाचं नाव आहे. तर ओमकार काशीद असं हल्ल्यात जखमी झालेल्या वेटरचं नाव आहे. ही धक्कायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हल्ला झाल्यानंतर मराडे यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या.
Tags
