अक्कलकुवा तालुक्यात ८५ मिलीमीटर पावसाची नोंद; पूरामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून काल सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. एकट्या अक्कलकुवा तालुक्यात जवळपास काल, रविवारी 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवनावर परिणाम झाला आहे. पूराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या देव नदीच्या पुराच्या पाण्याने अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील आश्रम शाळेला वेढा दिला, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धावपळ उडाली होती. आश्रम शाळेत उपस्थित 202 विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून ४० वर्षानंतर पूर्ण झालेल्या देहली मध्यम प्रकल्पात पहिल्याच पुराच्या पाण्यात जलमय स्थिती पाहायला मिळाली आहे. अनेक शेतांमध्ये व पुनर्वसंन न झालेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सरासरी ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी आणि छोटे नाले भरून शेतांमध्ये जलमय परिस्थिती झाली असून वस्तींमध्ये पाणी शिरले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या या गावातील नागरिकांना प्रशासनाने जलमय परिस्थितीचा आढावा घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default