मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.नगर तालुक्यातील एका गावातून या आरोपींनी अल्पवयीनचे अपहरण केले होते.
या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने या गंभीर घटनेची दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सूखरुप सुटका केली
