तसेच दिनांक १४ जुलै २०२२ रोजी ११ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असतांना नराधमाने घरात घुसुन विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील नराधमाने दोन वेळेस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणुन संबधीत मुलीने आरोपी विरूद्ध स्वतः शहादा पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली आहे
मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 470/2022 भादवी कलम 376, 354, 452, 506 लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत व शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी भेट दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक माया राजपूत हे करीत आहेत.
