कोपरगावात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार

फुले शाहू आंबेडकर
0

अहमदनगर - कोपरगाव  शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सवमचे स्वागत कमान उभारण्यात येत असल्याने भाजपचे कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला.

त्यामुळे मंगळवारी दिवसभर दोन्ही गट आमने-सामने आले होते, आणि रात्रीच्या सुमारास भाजपा आणि राष्ट्रवादच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामूळे काही काळ तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं ,जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या घोषणा दिल्या तर भाजप कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.

त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र कोपरगाव शहर पोलीस व शीघ्र कृती दलाचे जवान वेळीच घटना स्थळी दाखल झाले व जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी पळताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे किरकोळ जख्मी झाले.

दरम्यान, ज्या स्वागत कमानीवरून वाद सुरू झाला ती कमान पोलिसांनी लगेचच हटवली आहे. प्रशासनाला जर कमान हटवायची होती तर मग दिवसभर वाट का पाहिली असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default