गोंदिया : जिल्ह्यातील देवरी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दागीने लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शशीकला साखरे (३५) असं मृत महिलेचं नाव आहे. शहरातील पंचशील चौक येथिल प्रभाग क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोराने महिलेचा हत्या करुन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घरी परतलेल्या मुलांनी आई शशीकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची पाहिलं आणि ही भयंकर घटना उघडकीस आली. याप्रकरणी देवरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील पंचशील चौक येथे एका महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आलीय. शशीकला साखरे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. चोरीच्या प्रकरणामुळं महिलेची हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक असोक बनकर व देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रेवचंद सिंगनजुडे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
