गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला होता. तर दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झेंडा फडकावला. परंतु, काही दिवसातच खडसेंना धक्का बसला आहे.
रावेर तालुक्यातील ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत शिंदे गटाला धक्का दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे येथील वर्चस्व सिध्द झाले. मात्र ग्रामपंचायतीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत धक्का दिला आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
